Gold Price Today: मोठी बातमी! शुद्ध सोनं आणखी महागलं; जाणून घ्या आजचे प्रतितोळा सोन्याचे दर
Gold Price Today: सोन्याच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून मोठी चढउतार झालेली (Gold Price Hike Today) पाहायला मिळाली आहे. आज मात्र सोन्याचे दर पुन्हा वधारले आहेत. येत्या काही काळात सोन्याचे भाव हे वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा जाणून घेऊया काही दिवसात सोन्याचे भाव (Gold Price) कसे बदलले?
Gold Price Today: सोन्याच्या दरात काल घट पाहायला मिळाली तसेच सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण (Gold Price in Mumbai) पाहायला मिळते आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात सोन्याचे दर हे लक्षणीय वाढले होते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तापासून मात्र सोन्याच्या दरात घसरण दिसून येते आहे. आज 24K सोन्याचे भाव हे 62,130 रूपये प्रति 10 ग्रॅम इतके असून 22k सोन्याचे भाव हे 59,950 रूपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज सोन्याच्या भाव घसरण आणि वाढ नसून आजचे सोन्याचे भाव हे 'जैसे थे' आहेत. तेव्हा आजही तुम्हाला सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे परंतु असं असलं तरी मात्र कालच्यापेक्षा (Gold Price Latest) आज सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.
एप्रिलच्या सुरूवातीला सोन्याचे दर हे गगनाला भिडले होते. सोन्याचे दर हे गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक वाढले होते. तेव्हा गेल्या वर्षाच्या तुलनेत सोनं हे 60 हजाराच्या पार गेले होते. यंदा सोन्याचे दर हे 62 हजाराच्या वर पोहचले आहेत. (gold price today 24 carat gold price hike know the latest update in marathi)
दोन दिवसात पुन्हा मोठी वाढ
गुडरिटर्न्सच्या वेबसाईटनुसार, 6 आणि 7 मेच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यानंतर सोन्याच्या दरात 120, 100 आणि 280 रूपयांचे सलग वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे या वाढीचा परिणाम म्हणून आजही सोन्याचे भाव हे 62 हजारांच्या वर गेले आहे. अक्षय्य तृतीयेनंतर (Gold Price in May) मात्र सोन्याचे 62 हजारा पार गेलेले भाव कुठे कमी होत 60 हजारापर्यंत आले होते परंतु आता मात्र सोन्याचे भाव हे परत 62 हजाराच्या वर गेले आहेत.
कसे आहेत सोन्याचे भाव?
आज 22 कॅरेट सोन्याचे भाव हे 5,695 रूपये प्रति 1 ग्रॅम आहेत. तर 45,560 रूपये प्रति 8 ग्रॅम आहेत. 56,950 रूपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 5,69,500 रूपये प्रति 100 ग्रॅम आहे. त्याच बाजूला 24 कॅरेट सोन्याचे भाव हे 6,213 रूपये प्रति 1 ग्रॅम, 49,704 रूपये प्रति 8 ग्रॅम, 62,130 रूपये प्रति 10 ग्रॅम आणि 6,21,300 रूपये प्रति 100 ग्रॅम इतके आहेत.
हेही वाचा - Samantha Ruth Prabhu नं 'या' शहरात घेतलं अलिशान घर, किंमत वाचून व्हाल हैराण
चांदीचे दर काय?
आज चांदीचे भाव हे घसरले आहेत. कालच्या एवढेच (Sliver Price) आजचे चांदीचे भाव आहेत. आज चांदी 78 हजार रूपये प्रति 1 KG आहे.