Samantha Ruth Prabhu नं 'या' शहरात घेतलं अलिशान घर, किंमत वाचून व्हाल हैराण

Samantha Ruth Prabhu Buys new House: सध्या दाक्षिणात्त्य चित्रपट हे तूफान चालताना दिसत आहे. त्याचबरोबर दाक्षिणात्त्य कलाकारही (Samantha Ruth Prabhu Hydrabad House) चांगली कमाई करताना दिसत आहेत. तुम्हाला माहितीये का की तुमची लाडकी अभिनेत्री समंथा रूथ प्रभू हिनं हैद्राबादमध्ये एक आलिशान घर घेतलं आहे.

गायत्री हसबनीस | Updated: May 10, 2023, 10:07 PM IST
Samantha Ruth Prabhu नं 'या' शहरात घेतलं अलिशान घर, किंमत वाचून व्हाल हैराण title=

Samantha Ruth Prabhu Buys new House: समंथा रूथ प्रभू आपल्या आगाळ्यावेगळ्या स्टाईल आणि अभिनयासाठी ओळखली जाते. समंथाचे अनेक चित्रपट गाजले आहेत. त्यातून तिच्या पुष्पा या चित्रपटातील गाण्यानं तिच्या लोकप्रियेतत चांगलीच वाढ झाली होती. आज समंथाचे अनेक जगभर फॅन्स आहेत. समंथा ही दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीत एक लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. तिचा यशोदा हा चित्रपट काही महिन्यांपुर्वी प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटाला प्रेक्षकांकडून तूफान प्रतिसाद आला होता. त्यानंतर तिचा शाकुंतलम हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तेव्हा या चित्रपटाचीही सगळीकडेच क्रेझ आहे. परंतु तुम्हाला माहितीये का तुमच्या या आवडत्या अभिनेत्रीनं हैद्राबादमध्ये एक आलिशान घर घेतलं आहे. (Samantha Ruth Prabhu Buys new House in hydrabad for 7.8 crore)

काय आहे फ्लॅटची किंमत? 

समोर आलेल्या माहितीनुसार, समंथानं हैद्राबाद येथे 3BHK ड्यूप्लेक्स अपार्टमेंट घेतले आहे. जयाभेरी ऑरेंज कॉऊंटी हे नानकर्मगुडा येथे आहे. हे हैद्राबादमध्ये जयाभेरी ऑरेंज कॉऊंटी येथे स्थित आहे. या फ्लॅटची किंमत 7.8 कोटी रूपये इतकी आहे. ही तिचं हैद्राबाद मधलं दुसरं घरं आहे. सीआर मेट्रीक्स या रियल इस्टेट डाटा एनालेसिस फर्मनुसार, हा फ्लॅट 7,944 स्केवर फूटसह 3,920 स्केवर फूट आहे. हा फ्लॅट 13 व्या मजल्यावर असून 4,024 स्केवर फूट 14 व्या मजल्यावर आहे. 

अशी आहे समंथाची नेटवर्थ

त्याचसोबत तिच्याकडे जुबली हिल्स येथेही एक घर आहे. ती तिच्या तो पेट्ससोबत येथे राहते असं सांगितले जाते. मुंबईत समंथाची 15 कोटींची प्रोपर्टी आहे. तर तिची नेटवर्थ ही 100 कोटी आहे. तिच्याकडे अनेक मोठ्या कार्स आहेत. समंथा ही आपल्या एका चित्रपटासाठी कोट्यवधी रूपये घेते. 3 ते 8 कोटी असं जवळपास तिचं मानधन आहे. नागा चैतन्यासोबत झालेल्या घटस्फोटानंतर ती आपलं आयुष्य हे आपल्या मर्जीप्रमाणे जगते आहे. सध्या तिच्याकडे अनेक मोठ्या आणि महागड्या गाड्यांचे कलेक्शन असून तिचं प्रत्येक चित्रपटाचे मानधनही तगडे आहे.

सध्या समंथा एका वेगळ्याच आजाराशी झुंज देते आहे. आपल्या आजाराविषयी ती सोशल मीडियावरून चाहत्यांना अपडेट कसत असते. आपल्या कामाबद्दल आणि आपल्या पर्सनल लाईफबद्दलही ती आपल्या चाहत्यांना अपडेट करते. सध्या समंथा सिंगल असून ती कुठल्याही रिलेशनशिपमध्ये नसल्याचे कळते आहे. सध्या ती फक्त आपल्या कामावरच लक्ष केंद्रित करते आहे.