नवी दिल्ली : बुधवारी सराफा बाजार सुरु होताच सोन्याच्या दरात gold price today वाढ पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर MCX सोन्याच्या दरात जवळपास 177 रुपयांची वाढ झाली. MCXवर सोन्याचा दर 51,101 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. चांदीच्या दरातही 129 रुपयांची वाढ झाली आहे. चांदी 64,136 रुपये प्रति किलो इतकी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपर्यंत सोन्याच्या दर नवा रेकॉर्ड करु शकतो. जेपी मॉर्गनच्या एका रिपोर्टनुसार, आर्थिक परिस्थिती, कोरोना महामारी आणि राजकीय परिस्थिती पाहता दिवाळीपर्यंत सोनं 70 हजार रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. जरी कोरोनाची लस आली तरीही जागतिक अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. तोपर्यंत सोन्याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.


सोन्यावर जीएसटी लागू केल्यानंतर ग्राहकांना सोन्याच्या खरेदीवर 3 टक्के टॅक्स भरावा लागत आहे.सोनं खरेदी केल्यानंतर, ते विकतानाही त्यावर टॅक्स भरावा लागतो. परंतु हा टॅक्स आपण किती काळ सोनं ठेवलं यावर अवलंबून आहे. कमी कालावधीसाठी असल्यास, त्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल आणि अधिक कालावधीसाठी असल्यास लॉन्ग टर्म कॅपिटल गेनच्या आधारे त्यावर टॅक्स भरावा लागतो.


कोरोना काळात गुंतवणूकदारांचा सोनं खरेदीकडे कल वाढला आहे. जागतिक अर्थव्यवस्था तसंच शेअर बाजारातील अनिश्चिततेच्या वातावरणामुळे गुंतवणूकदारांची पहिली पसंती सोन्याला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचा भाव 39 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता. मात्र पुढील सहा महिन्यात सोन्याच्या दरांत विक्रमी वाढ पाहायला मिळाली. गेल्या एका वर्षात सोन्याच्या किंमतीत जवळपास 25 टक्क्यांची वाढ झाली आहे.