Gold Rate Today | सोने-चांदीच्या भावात तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदार सरसावले
यूएस फेड रिझर्व्हने व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे सोन्याच्या दरांमध्ये चांगली तेजी दिसून आली. सकारात्मक जागतिक संकेतांमुळे गुरुवारी भारतातील सोन्याच्या दरात वाढ दिसून येत आहे.
मुंबई : यूएस फेड रिझर्व्हने व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे सोन्याच्या दरांमध्ये चांगली तेजी दिसून आली. सकारात्मक जागतिक संकेतांमुळे गुरुवारी भारतातील सोन्याच्या दरात वाढ दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) गोल्ड ऑगस्ट फ्युचर्स 0.57 टक्क्यांनी वाढून 51,007 रुपये प्रति 10 ग्रॅम वर व्यवहार करत आहे.
चांदीचा सप्टेंबर फ्युचर्स 1,306 रुपये किंवा 2.38 टक्क्यांच्या वाढीसह 56,150 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या किमती वाढण्यामागे अमेरिकन डॉलर आणि ट्रेजरी यील्डमधील घसरण कारणीभूत आहे.
IBJA संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सराफा बाजारातील आजचे सोन्याचे दर 500 रुपयांहून जास्तने वाढून 51174 रुपये तोळे इतके झाले. तर चांदीचे दर 55844 रुपये प्रति किलो इतके आहेत.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दरांमध्ये वाढ होऊन 56 हजार प्रतितोळेंवर पोहचले होते. आज सोने 47 हजार 500 च्या आसपास ट्रेड करीत आहे.
त्यामुळे रेकॉर्ड हाय पेक्षा सोने स्वस्तच मिळत असल्याने सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल दिसून येत आहे.