Gold Rate Today 25th April 2023:  अक्षय्य तृतीयेपर्यंत सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली होती. परंतु आता सोन्याचे दर हे घसरलेले पाहायला (24K Gold Price Today) मिळत आहेत. आज सोन्याच्या भाव घसरण पाहायला मिळते आहे. आज 22 कॅरेट सोनं हे 55,640 रूपये प्रतितोळा असून 24 कॅरेट सोनं हे 60,700 रूपये प्रतितोळा आहे. तर 8 ग्रॅमचं सोनं हे 22 कॅरेटसाठी 48,560 रूपये आणि 24 कॅरेटसाठीचे भाव हे 48,568 रूपये प्रतितोळा आहे. 22 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तानंतर (Akshya Trutiya 2023) सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळालं आहे. गुडरिटर्न्सच्या रिपोर्टनुसार, त्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दिवशी सोनं हे 60,820 रूपये प्रति 10 ग्रॅम इतके होते. त्यादिवशी सोन्याच्या दरात 330 रूपयांची घट झाली होती. त्यानंतर 23 एप्रिल रोजी 60,790 रूपये इतकी सोन्याची किंमत होती. या दिवशी 30 रूपयांची घट झाली. 24 एप्रिल रोजी सोन्याचे दर हे 60,710 रूपये प्रति 10 ग्रॅम इतके होते. या दिवशी 80 रूपयांची घट झाली होती. तर आज सोन्याचे दर हे 60,700 रूपये प्रति 10 ग्रॅम इतके आहे, आज सोन्याच्या दरात कालपेक्षा 10 रूपयांची घट झाली आहे. (gold price today check the latest gold price in your city)


सोन्याच्या भावात घसरण


एप्रिल महिन्यात सोन्याचे भाव हे गगनाला भिडले होते. त्यातून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातही सोन्याच्या भावांमध्ये मोठी वाढ झाली होती. याच दरम्यान सोन्याचे भाव हे 60 हजाराच्या पार गेले होते. त्यामुळे ग्राहकांची चिंता वाढली होती. परंतु आता ग्राहकांना थोडाफार दिलासा मिळलेला दिसतो आहे. 60 हजाराच्या पार गेलेले सोन्याचे भाव हे आता थोड्याफार प्रमाणात का होईना आणि मोठ्या चढउतारानंतर 60 हजारापर्यंत इतके खाली आले आहेत. 


शुद्ध सोनं आणखीनं सवस्त


गेल्या दोन महिन्यात सरासरी सोन्याचे भाव हे 59 हजारांच्या आसपास राहिलेले आहेत. त्यातून आता गेल्या दहा दिवसांपासूनही सोन्याच्या दरात मोठी घसरण होते आहे. या दहा दिवसात 60 हजार पर्यंत पोहोचले आहेत. महिन्याभरापासूनही हे दर एवढेच आहेत असं म्हणता येईल. शुद्ध सोन्याच्या दरात ही घसरण झाल्यामुळे आता ग्राहकांसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. येत्या लग्नसराईच्या मोहोलमध्ये तुमच्यासाठी ही आणखीनं ेएक संधी चालून आली आहे. तेव्हा आजिबातच वेळ घालवू नका. 


तुमच्या शहरातील किंमत जाणून घ्या 


कोल्हापूर - 5,564 प्रति ग्रॅम 
वसई विरार - 5,567 प्रति ग्रॅम
सोलापूर - 5,564 प्रति ग्रॅम 
नाशिक - 5,567 प्रति ग्रॅम
नागपूर - 5,564 प्रति ग्रॅम 
पुणे - 5,564 प्रति ग्रॅम