Gold Rate Today | सलग तिसऱ्या दिवशी घसरले सोन्याचे भाव; चांदीही स्वस्त
Gold price today falls : भारतात गेल्या 3-4 दिवसात सोन्याच्या दरांमध्ये घसरण नोंदवली गेली आहे तर, चांदीचे दर 2 महिन्यांच्या उच्चांकी दरापेक्षा 5 हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
मुंबई : सोने चांदीचे भाव नेहमीच चर्चेचा विषय असतात. सध्या शेअर बाजारातील अनिश्चितेतेच्या वातावरणामुळे अनेक गुंतवणूकदार सोने चांदीत खरेदी करीत आहेत. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. भारतात गेल्या 3-4 दिवसात सोन्याच्या दरांमध्ये घसरण नोंदवली गेली आहे तर, चांदीचे दर 2 महिन्यांच्या उच्चांकी दरापेक्षा 5 हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
भारतात सध्या कोविड 19 विषाणूच्या संसर्गाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीची लोकांनी खरेदी केली होती. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर 55 हजार प्रति तोळेच्या पुढे गेले होते.
मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX)मध्ये आज दुपारी 1.30 वाजेपर्यंत सोन्याचे दर 47371 रुपये प्रति तोळेवर ट्रेड करीत होते. तर चांदी 60224 रुपये प्रति किलोवर ट्रेड करीत आहे.
मुंबईतील सोन्याचे दर
7 जानेवारी 48,820 प्रति तोळे
6 जानेवारी 48,830 प्रति तोळे
5 जानेवारी 49,080 प्रति तोळे
6 जानेवारी 49,260 प्रति तोळे
मुंबईतील चांदीचे दर
7 जानेवारी 60400 प्रति किलो
6 जानेवारी 60600 प्रति किलो
5 जानेवारी 62300 प्रति किलो
4 जानेवारी 61700 प्रति किलो
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे लग्नसराईच्या आयोजनालाही खिळ बसली आहे. त्यामुळे सोने चांदीची मागणी कमी झाली आहे. काही आठवड्यांपूर्वी सराफा बाजारात सोन्याचे दागिने खऱेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग पाहायला मिळत होती. परंतू कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ग्राहकांचा सोने खरेदीचा प्रतिसाद थंडावला आहे.