मुंबई : सोन्याच्या दरात सराफ बाजारात सोमवारी तेजी पाहायला मिळाली. मात्र चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली. स्थानिक बाजारात सोन्याच्या घसरणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. याचमुळे दिल्लीत सराफ बाजारात वाढ पाहायला मिळाली. प्रत्येक 10 ग्रॅमवर 100 रुपयांची वाढ झाली असून 31,550 रुपये असा आताचा दर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर चांदीच्या भावात 50 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. चांदीचा दर 50 रुपयांनी खाली आला असून आता 38,100 रुपये पर्यंत पोहोचला आहे. चांदीचा दर खाली पडण्यामागे इंडस्ट्रीयल युनिट आणि सिक्के बनवणाऱ्यांचा मुख्य हेतू आहे. सिंगापूरमध्ये सोन्याचा दर 0.13 टक्क्यांनी खाली आला असून 1,197.20 डॉलर आहे. आता अशी माहिती मिळतेय की, चीनने अमेरिकेसोबत होणाऱ्या व्यापाराची चर्चा थांबवली आहे. यामुळे डॉलरमध्ये मजबूती पाहायला मिळाली आहे.


स्थानीक बाजारात 99.9 टक्के शुद्ध सोन्याच्या दरात वाढ 100 रुपयांनी झाली आहे. क्रमशः हा दर 31,550 रुपये आणि 31,400 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. तर शनिवारी सोन्याचा दरात 250 रुपयांची घसरण पाहायला मिळाली.