मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवर संघर्षाचा भडका उडाल्याने सोने दरावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. देशात सोने दरात विक्रमी वाढ दिसून आली आहे. चेन्नईत सोने (२४ कॅरेट) दर ४२ हजार ८६० रुपये इतक्या विक्रमी उच्चांकावर पोहचला. मुंबईत हाच दर ४१,२०० होता. त्यामुळे सोने आणखी भाव खाणार अशी शक्यता होती. मात्र, आखाती देशांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता कमी झाल्यानंतर सोन्याच्या किंमती आता घसरतील, असा सराफा व्यावसायिकांचा अंदाज आहे. गुरुवारी, अमेरिका-इराणमध्ये समझोता होण्याचे संकेत मिळत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने किमती घट दिसून येऊ लागली आहे. आज सोन्याची किंमत प्रति औंस १६१० प्रति औंस डॉलर घटून ती १५४६ प्रति औंस डॉलर खाली आली आहे. त्यामुळे सोन्याचे वायदा बाजारातील दर दहा ग्रॅम ७०० रुपयांनी कमी झाले आहेत. लवकरच भारताच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमती लवकरच कमी होतील, असा अंदाज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या मते, सोने स्वस्त असू शकते. अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी झाल्यामुळे जगभरातील शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली आहे. भारतीय बाजारातही उत्साह दिसून आला आहे. बीएसईचा ३० समभागांचा प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स ६०० अंकांनी वधारला. त्याचबरोबर निफ्टीनेही सुमारे २०० अंकांची उसळी घेतली आहे. गुंतवणूकदारांचा कल पाहता सोन्याच्या किंमतीही आणखी खाली येऊ शकतात. तज्ञांच्या मते, ताण कमी झाल्यामुळे गुंतवणूकदार इक्विटी मार्केटमध्ये परत येतील. त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर होणार आहे.


भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात होत असते. मात्र, इराण - अमेरिका संघर्षामुळे यावर परिणाम दिसून येत आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रूपयाची झालेली घसरणही सोने दरवाढीमागील कारण असल्याचे जाणकार सांगतात. चेन्नईमध्ये सोन्याच्या दराने ४२ हजार ८६०, कोलकात्यात ४१ हजार ७८० तर अहमदाबादमध्ये ४१ हजार ६३०, दिल्लीत ४१ हजार २८० आणि मुंबईत ४१ हजार २०० रूपयांचा टप्पा गाठला आहे.