सोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढ, पहिल्यांदाच सोन्याने गाठला 75 हजारांचा आकडा; वाचा 24 कॅरेटचा भाव
Gold Rate Today In Marathi: आज सोन्या-चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. जाणून घ्या आज सोन्याचा काय दर आहे.
Gold Rate Today In Marathi: सणासुदींच्या दिवसांत सोनं-चांदीच्या दरात मोठी उसळी घेतली आहे. सोन्यानं नवा उच्चांक गाठला आहेय वायदे बाजारात पहिल्यांदा सोनं पहिल्यांदा 75 हजारांच्या वर गेलं आहे. COMEX वरील किंमत देखील $2,665 चा विक्रमी उच्चांक ओलांडली आहे. याचा परिणाम म्हणून वायदे बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. दुसरीकडे, काल चांदीच्या भावानेही ३३०० रुपयांची उसळी घेत ९२५०० रुपयांच्या वर पोहोचला होता, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही भावाने ४ टक्क्यांनी मोठी उसळी घेत ३२ डॉलरच्या वर पोहोचला होता.
गुडरिटर्न्सनुसार, आज सोन्याच्या दरात 660 रुपयांची वाढ झाली असून 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 77,020 रुपयांवर पोहोचलं आहे. तर. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 600 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा 70,600 रुपयांवर दर स्थिरावले आहेत. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली असून 57,770 रुपयांवर स्थिरावलं आहे. 6 महिन्यांत सोने 15,000 रुपयांनी महागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने $2,670 चा विक्रम गाठला आहे.
चांदीच्या दरात थोडीशी घसरण झाली. तो 169 रुपयांच्या घसरणीसह 92,224 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता. काल तो ९२,३९३ वर बंद झाला. चांदीने 4 महिन्यांतील सर्वात महागडा दर गाठला आहे. यंदा चांदीच्या दरात २५ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. अनेक यूएस फेडरल रिझर्व्ह सदस्यांनी व्याजदरात आणखी कपात करण्यासाठी मार्ग मोकळा केल्याने सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात उसळी घेतल्याचे बोललं जात आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 70,600 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 77,020 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 57,770 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,060 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 702 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 777 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 56, 480 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 61, 616 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 46, 216 रुपये
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 70,600 रुपये
24 कॅरेट- 77,020 रुपये
18 कॅरेट- 57,770 रुपये