Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज गोल्ड आणि सिल्वर दोन्ही मौल्यवान धातूमध्ये वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात आज 220 रुपयांची वाढ झाली आहे. तर, चांदीच्या दरातही 600 रुपयांइतकी वाढ झाली आहे. भारतीय वायदे बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंनी उसळी घेतली आहे. MCX वर आज सोनं 220 रुपयांच्या तेजीसह  प्रति 10 ग्रॅमसाठी 73,420 रुपयांवर स्थिर झाले आहे. तर चांदी 629 रुपयांच्या तेजीसह 93,461 प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सराफा बाजारात वाढले सोन्या-चांदीचे दरांनी चांगलीच उसळी घेतली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज 220 रुपयांची वाढ झाली असून आजचा दर 73,420 रुपये इतका झाला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दरात 200 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं आज 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 67,300 रुपये इतके झाले आहे. 


गुडरिटर्नने दिलेल्या माहितीनुसार, आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 1 ग्रॅमसाठी 6,730 रुपये इतकी आहे. तर, 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,342 रुपये इतकी असून 18 कॅरेट सोन्याची किंमत 5,505 इतकी आहे. लग्नसराईचे दिवस जरी संपले असले तरी सोन्याची मागणी भारतात कायम असते. आता आषाढ महिना सुरू आहे. या पुढच्या श्रावणात अनेक सण-समारंभ सुरू होतात. अशावेळी सोन्याच्या मागणीत पुन्हा वाढ होऊ शकते. जून महिन्यात कमी झालेले दर जुलैमध्ये वाढल्याचे दिसत आहेत. 


असा आहे सोन्याचे दर


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट   67, 300 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   73,420 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   55,060 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6,730 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,342 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5,506  रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   53, 840 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   58, 736  रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    44, 048  रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट-  67, 300   रुपये
24 कॅरेट-  73,420 रुपये
18 कॅरेट-  55,060  रुपये