Gold Price Today: सोनं आणि चांदीच्या दरांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. वायदे बाजारात सोन्यात सातत्याने घसरण होत आहे. बुधवारी (28 ऑगस्ट) रोजीदेखील घसरण झाली होती. मात्र, सराफा बाजारात मोठी उसळी देखील नोंदवली आहे. तुम्ही आज बाजारात सोनं खरेदीसाठी जात असाल तर आज तुम्हाला दर वाढलेले दिसणार आहेत. वायदे बाजारात सोनं आज 220 रुपयांनी वाढलं आहे. आज 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 73,250 रुपये इतके झालं आहे. तर चांदीच्या दरात 358 रुपयांची घसरण झाली आहे. आज चांदी प्रतिकिलो 85,300 रुपयांवर व्यवहार करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात किंचितशी घसरण झाली आहे.  HDFC Securitiesमध्ये वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूएस मॅक्रो डेटा आणि यूएस बॉण्ड उत्पन्नात अपेक्षेपेक्षा चांगली वाढ झाल्यामुळे मंगळवारी सोन्यामध्ये किरकोळ घसरण झाली आहे. MOFSL चे कमोडिटी रिसर्चचे वरिष्ठ विश्लेषक मानव मोदी यांच्या मते, सोन्याच्या किमती घसरल्या. मात्र गेल्या आठवड्याच्या विक्रमी उच्चांकामुळं अमेरिकन व्याजदरात कपात होण्याची शक्यतेमुळं डॉलर कमकुवत झाला आणि त्याचा परिणाम मौल्यवान धातुच्यां किंमतीवर परिणाम झाला आहे. 


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  67,150 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  73,250 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  54,940 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6, 715 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 325 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 494 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   53, 720 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   58, 600 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    43, 952 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट- 67,150 रुपये
24 कॅरेट- 73,250 रुपये
18 कॅरेट-   54,940 रुपये