Gold Price Today: आजपासून हिंदू धर्मात लग्नसराईला सुरुवात होणार आहे. आज तुळशीचं लग्न आहे. तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराईंला सुरुवात होते. लग्नसराईला सुरुवात होताच ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. चांदीचे दरही कोसळले आहेत. दोन्ही मौल्यवान धातुचे भाव जवळपास महिनाभराच्या अंतराने कमी झाले आहेत. डॉलरच्या मजबुतीमुळं आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळं सातत्याने सोनं-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहे. मात्र, सोन्याचे भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 76,850 रुपयांवर पोहोचलं आहे. आता भारतात लग्नसराईला सुरुवात झाली आहे. त्यामुळं वधु-वरांसाठी दागिने खरेदीची लगबग असते. आता ग्राहकांना दागिने खरेदीची सुवर्णसंधी आहे. आज सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळं ग्राहक दागिने खरेदी करु शकतात.


आज 22 कॅरेट सोन्याचे दर 400 रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळं आज प्रतितोळा सोन्याचे दर 70,450 रुपयांवर पोहोचले आहेत. 18 कॅरेट सोन्याचे दर 57,640 रुपयांवर पोहोचले आहेत. आज 18 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांची घसरण झाली आहे. 


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  70,450 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  76,850 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  57,640 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,045 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 685 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 764 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   56,360 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   61,480 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    57,640 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट- 70,450 रुपये
24 कॅरेट- 76,850 रुपये
18 कॅरेट- 57,640 रुपये