सोनं चांदी झालं महाग! 24 आणि 22 कॅरेटचा आजचा भाव जाणून घ्या
Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आजचे सोन्याचे दर जाणून घ्या
Gold Price Today: सोन्याच्या दरात गुरुवारी वाढ झाल्याचे चित्र होते. मात्र, मागील आठवड्यात बाजारात नरमाईचे चित्र आहे. या आठवड्यात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर 168 रुपयांनी वाढून 71,900 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मात्र, नंतर पुन्हा सोनं 400 रुपये वाढून 72,121 रुपयांवर पोहोचले आहे. आज सोन्याचे दर 72,440 रुपयांवर स्थिर झाले आहेत. तर, 22 कॅरेट 10 ग्रॅम दर 200 रपयांनी वाढून 66,400 रुपये झाले आहे. चांदीदेखील आज 90,000 पार झाली आहे. आज 11 वाजण्याच्या सुमारास चांदीच्या दरात 1500 रुपये वाढ झाली आहे आणि 90,964 वर ट्रे़ड करत आहे.
अमेरिकेतील किरकोळ विक्रीच्या कमकुवत आकडेवारीनंतर व्याजदर कपातीची अपेक्षा बळकट झाल्याने सोन्याचे भाव स्थिर आहेत. स्पॉट गोल्ड 0.1% वाढून $2,331 प्रति औंस वर पोहोचले. त्याच वेळी, यूएस सोन्याचे भविष्य 0.1 टक्क्यांनी घसरून $ 2,345 वर आले. स्पॉट सिल्व्हरमध्ये 0.1 टक्क्यांची घसरण झाली आणि ती $29.49 वर नोंदली गेली.
आठवड्याच्या सुरुवातीला काही दिवस सोन्याच्या दरात घट झाली होती. सोनं आणि चांदीने निच्चांकी दर गाठला होता. मात्र, आज पुन्हा एकदा सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. अमेरिकेत अपेक्षेपेक्षा कमकुवत किरकोळ विक्रीच्या आकडेवारीनंतर बुधवारी सोन्यात किंचित सकारात्मक कल दिसून आला, ज्यामुळे सराफा किमतीत वाढ झाली.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 66,400 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 72,440 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 54,330 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6,640 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,244 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5,433 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 53, 120 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 57,952 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 43,464 रुपये
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 66,400 रुपये
24 कॅरेट- 72,440 रुपये
18 कॅरेट- 54,330 रुपये