आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त; जाणून घ्या 24 कॅरेटचे दर
Gold Rate Today 24th June: सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. सोमवारी सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचे चित्र आहे.
Gold Rate Today 24th June: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या किमतीत घट झाल्याचे चित्र आहे. आज सोमवारी 24 जून रोजी भारतीय वायदे बाजारात सकाळी सोन्याच्या दरात घट झाली आहे तर, चांदीचे दरात वाढ झाली आहे. आज 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 150 रुपयांची घट झाली आहे. तर, MCX वर चांदीच्या दरात 120 रुपयांनी दर वाढले आहेत.
शुक्रवारी वायदे बाजारात 1000 रुपयांनी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. तर, चांदीदेखील 2500 रुपयांनी घट झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर वाढल्याने सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र आहे. डॉलर मजबूत झाला असून 0.2% ने वाढून 7 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर रोखे उत्पन्न देखील वाढले होते, ज्यामुळे सोने 1 टक्क्यांनी घसरले होते. स्पॉट गोल्ड 1.7% घसरून $2,319 प्रति औंस झाले आहे. US Gold Future 1.6% च्या घसरणीसह $2,331 वर बंद झाला.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 66, 250 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 72, 230 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 54, 210 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6, 625 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 223 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 421 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 53, 000 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 57, 784 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 43, 368 रुपये
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 66, 250 रुपये
24 कॅरेट- 72, 230 रुपये
18 कॅरेट- 54, 210 रुपये