Gold Price Today: सोन्याच्या दर आज किचिंत वाढ झाल्याचे चित्र आहे. आज मंगळवारी 2 जुलै रोजी भारतीय वायदे बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर, चांदीच्या दरातही थोडी वाढ झाल्याचे पाहायला मिळतेय. MCX वर सोन्याने 100 रुपयांची उसळी घेतली आहे. त्यामुळं आज सोनं 72,380 रुपयांवर स्थिरावले आहे. काल भारतीय वायदे बाजारात सोन्याचे दर 72,280 रुपये इतके होते. तर आज चांदीच्या दरात 328 रुपयांनी वाढले असून 87,850 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे चित्र आहे. यूएसमध्ये जॉब डेटाच्या आकड्यांच्या प्रतिक्षेत असलेले गुंतवणूकदारांनी यापूर्वी शॉर्ट कव्हरिंग केली आहे. त्यानंतर किंमतीत तेजी आल्याचे चित्र आहे. यूएस स्पॉट गोल्डमध्ये 0.2 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2,329 डॉलर प्रति औंसवर नोंद झाली आहे. यूएस गोल्ड फ्युचर 2,338 डॉलरच्या आसपास स्थिर झाले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रेंच संसदीय निवडणुकीच्या पहिल्या फेरीनंतर सुरू असलेला जागतिक तणाव आणि अनिश्चितता यामुळं गुंतवणुक असलेली मालमत्ता वाढू शकते आणि अमेरिकन डॉलरमध्ये घसरण होऊ शकते. 


आज मंगळवारी एक ग्रॅम सोन्याचा दर 7,238 रुपये इतका आहे. तर, आज 22 कॅरेट सोन्याच्या दर 10 ग्रॅमसाठी 66,350 रुपये इतका आहे. तर आज 100 रुपयांची घसरण झाली आहे. तर, 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याच्या दरात 80 रुपयांची घसरण झाली आहे. 


असा आहे सोन्याचे दर


ग्रॅम              सोनं           किंमत


10 ग्रॅम     22 कॅरेट   66, 350 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   72, 380 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   54,290 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत


1 ग्रॅम     22 कॅरेट   6,635 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,238 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5,429  रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत


8 ग्रॅम     22 कॅरेट   53, 080 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   57, 904  रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    43, 432  रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट-  66, 350  रुपये
24 कॅरेट-  72, 380 रुपये
18 कॅरेट-  54, 290 रुपये