Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात शुक्रवारी पुन्हा एकदा घसरण झाल्याचे चित्र आहे. आज शुक्रवारी 31 मे रोजी सोन्याच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. सोन्याचे दर स्थिर आहेत. यापूर्वी गुरुवारी सोनं तीन दिवसांच्या दरवाढीनंतर स्वस्त झालं होतं. सराफा बाजाराबरोबरच आता वायदे बाजारातही सोन्याचे दर स्थिर आहेत. MCXवर जून कॉन्ट्रेक्टचा दर 71897 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. तर, चांदीच्या दरात घट झाली आहे. MCX वर चांदीमध्ये 1133 रुपयांनी घसरली असून आज चांदी 92,990 रुपयांवर ट्रेड करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारातही व्यवहार सुस्त असल्याचे दिसत आहे. परंतु, गेल्या काही आठवड्यात सोन्याच्या सततच्या चढ-उतारावरुनही स्पष्ट झाले आहे. सोने गेल्या चार महिन्यातील सर्वोच्च पातळीवर आहे. अमेरिकीतील चलनवाढीची आकडेवारी येण्यापूर्वी बाजारात मंदीचे वातावरण आहे. या महिन्यात सोन्याचा भाव 2.5 टक्क्यांनी वाढला आहे. यूएस सोन्याचा भाव 0.2 टक्क्यांनी घसरुन 2,341 प्रति औंस होता. 


सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जागतिक बाजारातील घसरणीमुळं, गुरुवारी दिल्लीत सराफा बाजारात सोने 350 रुपयांनी घसरुन 72,850 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर, चांदी विक्रमी उच्चांकी पातळीवर स्थिरावले आहे. चांदीचा भाव 1,100 रुपयांनी घसरून 96,000 रुपये प्रति किलो आहे. आज सोन्याचा दर 24 कॅरेटसाठी  72760 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. 


गुडरिटर्न्सनुसार, शुक्रवारी 31 मे रोजी सोन्याचा दर स्थिर आहे. आज बुधवारी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 72,760 इतका आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 66,700 रुपये इतका आहे.


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  66,700 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  72,760  रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  54, 570 रुपये