Gold Silver Price Today: कमोडिटी बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत होती. मात्र सोन्याच्या गरात पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. तर, चांदीच्या दरातदेखील चमक आली आहे. शुक्रवारी 5 जुलै रोजी भारतीय वायदे बाजारात मौल्यवान धातुच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज)वर सोन्याची 100 रुपयांची उसळी घेतली आहे. तर, चांदीच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचे दर पुन्हा एकदा 90 हजारांच्या वर गेले आहे. चांदीला सोन्यापेक्षा जास्त झळाळी आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सोनं 118 रुपयांच्या उसळीबरोबरच 72,485 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिर झाले आहे. काल सोन्याचा दर 72,367 रुपयांवर स्थिर झाले होते. चांदी 550 रुपयांच्या वाढीबरोबरच 90,580 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर झाली आहे. काल गुरुवारी चांदी 90,030 रुपयांवर स्थिर झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील सोन्याच्या दरात उसळी आली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याने झळाली घेतली आहे. व्याज दरात कपात होण्याची शक्यता असल्याने बाजारात सकारात्मक संकेत दिसत आहेत. स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्यांनी वाढून 1 आठवड्याच्या हाय 2,359 डॉलर प्रति औंसवर नोंद झाला आहे. यूएस डॉलरमध्ये किंचितशी घसरण होऊन 0.1 टक्क्यांनी घट होऊन 2,366 रुपयांवर स्थिर झाला आहे. 


अमेरिकेतील कमकुवत आर्थिक आकडेवारीमुळे फेडरल रिझव्र्ह बँकेकडून व्याजदर कपातीची शक्यता वाढली आहे, डॉलरचा निर्देशांक घसरला आहे आणि औद्योगिक धातूंचे भाव वाढत आहेत, त्यामुळे सोन्याच्या किमतीत एक टक्क्याहून अधिक वाढ झाली आहे. सोन्याचा भाव जवळजवळ दोन आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. त्याचवेळी चांदीच्या दरात दोन टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. 


मुंबईत सोन्याचा दर कसा आहे? 


मुंबईत आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 74571 ग्रॅम आहे. 


मुंबईत चांदीचा भाव काय आहे? 


मुंबईत आज चांदीची किंमत ₹90200.0/Kg आहे.