Gold Price Today : आज देशांतर्गत सराफ मार्केटमध्ये ( Bullion Market )  सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. सोने-चांदी स्वस्त झाल्यामुळे तुमच्या खिशावर जास्त ताण पडणार नाही असं दिसतंय. कालच्या वाढीनंतर आज सोन्या-चांदीत घसरणीचा कल दिसून येत आहे. सोने आज 48,000 रुपयांपर्यंत खाली आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोने आणि चांदीचे दर 


मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये, फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये सोने आणि चांदीचे भाव कमी राहिले. एमसीएक्सवर 87 रुपयांनी किंवा 0.18 टक्क्यांनी घसरल्यानंतर सोन्याचा दर 47,955 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे आणि त्यामुळे सोनं 48,000 च्या खाली आलं आहे. दुसरीकडे, चांदी ही आज 62,500 रुपये प्रति किलोच्या दराने विकली जात आहे.



सोने 8600 रुपयांनी कमी


 सोने उच्च पातळीपासून 8605 रुपयांपर्यंत खाली आले आहे आणि त्यात एवढी मोठी घसरण झाल्यानंतर, तज्ञांच्या मते, खरेदीच्या संधी उपलब्ध आहेत. कमोडिटी व्यापारीही यावेळी सोने खरेदीच्या संधी पाहत आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, सोने आणखी खाली येऊ शकते, परंतु ओमिक्रॉनच्या प्रसारामुळे जर डॉलरची घसरण झाली, तर जागतिक स्तरावर सोन्याची किंमत वाढू शकते.