Gold Rate Today: सणासुदीच्या दिवसांत सोनं-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण होत होती. मात्र, आता पुन्हा एकदा सोन्या दराने उसळी घेतली आहे. कमोडिटी बाजाराबरोबरच सराफा बाजारातही मौल्यवान धातुच्या दरांत वाढ होत आहे. सराफा बाजारात सोनं 75,110रुपयांवर स्थिरावलं आहे. आज 24 कॅरेट सोनं तब्बल 660 रुपयांनी वधारलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. तर, चांदी 91,000 हजारांच्यावर पोहोचली आहे. गुरुवारी सोनं स्वस्त झालं होतं मात्र आता पुन्हा एकदा सोन्याचे भाव वधारले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळी MCXवर सोनं 660 रुपयांनी वधारलं असून प्रतितोळा 75,110 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर, 22 कॅरेट सोनं 600 रुपयांनी वाढ झाली असून 68,850 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर, चांदी सुरुवातीला 181 रुपयांनी घसरुन89,787 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली होती. मात्र सकाळच्या व्यवहारात चांदी 91,000 रुपयांवर स्थिरावली होती. 


स्थानिक दागिने विक्रेत्यांकडून होत असलेली मागणी आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात करण्यात आलेली कपात यामुळंही सोन्याच्या दरात तेजी आल्याचे म्हटलं जात आहे. अखिल भारतीय सराफा संघानुसार, चांदीच्या किंमती सातत्याने तेजी येत आहे. बुधवारी चांदीच्या किंमती 500 रुपयांनी वाढून 91,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले होते. मागील सत्रात चांदी 90,500 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली होती. 


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  68,850 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  75,110 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  56, 330 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6,885 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 511 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 633 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   54, 080 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   60, 088 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    45, 064 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट- 68,850 रुपये
24 कॅरेट- 75,110 रुपये
18 कॅरेट- 56, 330 रुपये