Gold Price Today: सध्या शेअर बाजारात मोठी मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभुमीवर आता ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. सध्या लग्नसराईचा मोहोल सुरू झाला आहे त्यामुळे आता याच पार्श्वभुमीवर आता सोन्याची किमतीही कमी झाल्या आहेत. आज सोन्याचे भाव कमी झाले असून बाजारात चांदी दर वाढले आहेत. शुक्रवार, 23 डिसेंबर रोजी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव (Gold Price Today) 0.08 टक्क्यांनी घसरून 55,000 रुपयांच्या खाली आला. त्यामुळे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी हा एक सकारात्मक बदल आहे. आज चांदीची किंमत (Silver Price Today) 0.36 टक्क्यांनी वाढली आहे. (
Gold price today see todays gold and sliver price share market)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) व  सोनं आणि चांदीच्या फ्युचर्स किमतीत घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव आज 1.21 टक्क्यांनी घसरून $1,793.08 प्रति औंस झाला तर चांदीचा भाव आज 1.27 टक्क्यांनी घसरून $23.66 प्रति औंस झाला.


सकाळी किती होती किंमत? 


आज सकाळी 9.10 वाजता MCX वर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 41 रुपयांनी वाढून 54,480 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला तर चांदीचा भाव 245 रुपयांनी वाढून 68,765 रुपये प्रति किलोवर पोहोचला. आज सकाळी सोन्याचा दर 54,517 रुपये, तर चांदीचा दर आज 68,821 रुपयांवर पोहचला. 


कालचे भाव किती होते? 


गुरुवारी एमसीएक्स (MCX) 1.13 टक्क्यांनी आणि चांदीचा भाव 1.78 टक्क्यांनी घसरून बंद झाला. काल चांदीचा भाव 1,239 रुपयांनी घसरून 68,470 रुपयांवर आला. 


आजचं शेअर मार्केट कसं होतं? 


शेअर मार्केटमध्ये (Share Market) सोन्याच्या दरात 59 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 194 रुपयांची घसरण झाली. सोन्याचा भाव 59 रुपयांनी वाढून 55,241 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. भारतीय शेअर बाजारात आज मोठी पडझड झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. दिवसभरात बाजारात जवळपास सात लाख कोटींच्या वर मालमत्तेचा चुराडा झाला. निफ्टी 300 तर सेन्सेक्स 950 अंकांनी आपटला. सेन्सेक्स 60 हजारांच्या तर निफ्टी 18 हजाराच्या खाली घसरला. चीन आणि युरोपातील वाढत्या कोरोनामुळे जगभरातीलअर्थव्यवस्थांमध्ये मंदीचा धोका वाढलाय. अमेरिका आणि युरोपात ख्रिसमसच्या सुट्ट्यांआधी नफा वसूली करण्यावर परदेशी गुंतवणूकदारांचा भर दिसून येतोय. याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला.