मुंबई : Gold Price Today : सोने खरेदीचा विचार असेल तर ही सुवर्णसंधी. सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. एमसीएक्स सोना वायदा ०.३% घसरून ५२,७१२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. चांदी ०.६% टक्के घसरून ६९९७० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहे. सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यात तेजी पाहायला मिळाली होती. ऑगस्ट २०२२ पर्यंत सोन्याचा दर वाढणार ५६,२०० रुपयाच्या जवळ ५५,५५८  रुपये पोहोचणार आहे. 


सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशिया - युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा वैश्विक हाजारावर मोठा परिणाम होत आहे. या युद्धामुळे अनेक देशाची आर्थिक बाजू कोलडमली आहे. 
जर आपण जागतिक बाजारांवर नजर टाकली तर, आज सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत कारण दर वाढीच्या अपेक्षेमुळे यूएस ट्रेझरी उत्पन्नात वाढ झाली आहे.


११ महिन्यांत सोन्याची आयात वाढली 


भारतात सोन्याच्या आयातीमुळे चालू आर्थिक वर्षात ११ महिन्यात म्हणजे एप्रिल - फेब्रुवारीमध्ये ७३ टक्के वाढलं असून ४५.१ अरब डॉलरपर्यंत पोहोचलं आहे.