नवी दिल्ली : सणांच्या मोसमामुळे सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मंगळवारी सोन्याचे भाव १५० रुपयांनी वाढून ३१,१५० रुपये प्रती तोळा झाले आहेत. तर चांदीचे दर १७० रुपयांनी वाढून ३८,४७० रुपये किलो झाले आहेत. सणांच्या मोसमामुळे व्यापाऱ्यांकडून होणारी मागणी वाढल्यामुळे सोनं-चांदीचे दर वाढले आहेत.


राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ टक्के शुद्ध सोनं ३१,१५० रुपये आणि ९९.५ टक्के शुद्ध सोनं ३१ हजार रुपये प्रती तोळा झालं आहे. मागच्या तीन दिवसांमध्ये सोन्याचे दर ३८० रुपये तोळ्यानं वाढले आहेत. तर आठ ग्रॅम सोन्याच्या विटेचे दर १०० रुपयांनी वाढून २४,६०० रुपये झाले आहेत. सोमवारी सोनं १०० रुपये तोळ्यानं आणि चांदी ५० रुपये किलोनं वाढली होती.