मुंबई : सोमवारी महागलेल्या सोन्या चांदीच्या दरात आज बदल झाला आहे. सोन्या-चांदीच्या किंमतीच्या दरात आज घसरण पाहायला मिळाली. सोन्याचा दर उघडल्यापासून सम पातळीत आहे. सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला. मात्र आज दोन्ही दरात घसरण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MCX वर सोन्याचा दर १५० रुपयांनी घसरला असून आता दर ५०५३१ रुपये इतका आहे. सोन्याचा दर ५०६८७ रुपये इतका सोमवारी होती. सोन्याचा दर ५०६८७ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. ऑगस्ट महिन्याचा सोन्याचा दराने उच्चांक गाठला आहे. तेव्हापासून आजपर्यंत गेल्या तीन महिन्यात सोन्याचा दर ५८०० रुपयांनी कमी झाला आहे. 


चांदीच्या किंमतीतही बदल झाला आहे. MCX वर चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. २०० रुपये दर कमी झाला असून ६१८८७ रुपये प्रति किलो आहे. काल चांदीचा दर ६२०९५ रुपये इतका होता. पण इंट्रा डेमध्ये चांदीचा दर कालच्या भावापेक्षा वर आली होती. पण हा उच्चांक फार काळ टिकू शकला नाही. 


IBJA च्या वेबसाइटनुसार सोन्याचा दर २०० रुपयाने स्वस्त झाला असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१०२३ रुपये आहे. तर आजचा भाव ५०८१३ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. चांदीच्या दरात एकूण ९०० रुपये कपात झाली असून बाजारात सोन्याचा दर हा ६२५४० इतका आहे. आजचा दर हा ६१६२२ इतका आहे. 


डॉलरच्या दरात मजबूती असल्यामुळे परदेशी बाजारात सोन्याचा दर पडला आहे. स्पॉट गोल्ड १९०३.१६ डॉलर आहे.