मुंबई : स्थानिक आभूषण विक्रेत्यांमध्ये मागणी वाढल्यामुळे आणि वैश्विक बाजाराकडून मागणी वाढल्यामुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत 170 रुपयांनी वाढून 32,620 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच नाण्याची देखील मागणी वाढल्यामुळे चांदीच्या दरात 600 रुपयांमध्ये वाढ झाली असून 39,250 रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत पोहोचली आहे. तसेच स्थानिक आभूषणात विक्रेत्यांकडून मागणी वाढल्यामुळे विदेशी बाजारात देखील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 


चांदीमध्ये 600 रुपयांची वाढ 


दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 आणि 99.5 टक्के शुदध सोन्याच्या दरात 170-170 रुपयांची वाढ झाली असून अनुक्रमे 32,620 रुपये आणि 32,470 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचलं आहे. 


तसेच 100 रुपये वाढून हा दर प्रति 8 ग्रॅम 25,200 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. चांदी 600 रुपयांनी वाढत असून 39,250 रुपये प्रति किलोग्रॅम आणि साप्ताहिक डिलीवरी 1,448 रुपये वाढ झाली असून 38,651 प्रति किलोग्रॅम झालं आहे.  


चांदीच्या नाण्यात देखील 1000 रुपयांनी वाढ 


चांदीच्या नाण्यात 1000 रुपयांची वाढ झाली असून दर 76 हजार रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. 77 हजार रुपयांपर्यंत प्रति शेकडा पोहोचलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची दर 1,278.10 डॉलर प्रति टक्के आणि चांदी मजबूत झाली असून 15.26 डॉलर प्रति टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे.