मुंबई : एकिकडे देशात लॉकडाऊन लागू असतानाच दुसरीकडे उद्योगधंदे आणि व्यवसायांवर होणाऱ्या याचा परिणामांची चर्चा सुरु आहे. तर, दुसरीकडे सोनं आणि चांदीच्या दरांनी गाठलेला उच्चांक बाजारातील तेजी समोर आणत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी, म्हणजेच १५ मे रोजी, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपण्यास काही दिवस उरलेले असतानाच सोन्याचे दर मुंबईत ४७,३४२ वर पोहोचले आहेत. एमसीएक्स म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आलेल्या उसळीमुळे दरांनी उंची गाठल्याची म्हटलं जात आहे. सोन्यासोबतच चांदीच्या दरांमध्येही चांगलीच वाढ झाल्याचं कळत आहे. 


देशातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये सोन्याचे दर पाहिले असता २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरांच्या किमतीत दहा रुपयांनी वाढ झाली आहे. परिणामी सोन्याच्या दरांनी येथे ४५,२१० इतका आकडा गाठला आहे. तर, २४ कॅरेट सोन्याच्या दराने प्रतितोळा ४७,२१० इतके दर गाठले आहेत. 


 


चेन्नईत सोन्याचे २२ कॅरेट सोन्याचे दर ४४,७३० रुपये, तर, २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,७६० रुपयांवर पोहोचले आहेत. कोलकाता आणि मुंबईतही सोन्याच्या दरांना लक्षवेधी झळाळी मिळाल्याचं पाहायल मिळालं. शुक्रवारी वायदा बाजारात चांदीच्या दरांमध्येही चांगली तेजी पाहायला मिळाली. ज्या धर्तीवर प्रतिकिलोसाठी चांदीच्या दरांनी ४५,४८३ इतके दर गाठल्याचं पाहायला मिळालं.