सोन्याच्या दरात १०० रुपयांची घसरण, चांदीचे दरही घसरले
सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झालीये. स्थानिक बाजारात सोन्याची मागणी घटल्याने त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवर दिसतोय.
मुंबई : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झालीये. स्थानिक बाजारात सोन्याची मागणी घटल्याने त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवर दिसतोय.
शुक्रवारी सोन्याच्या दरात १०० रुपयांची घसरण पाहायला मिळाली. या घसरणीनंतर सोन्याचे दर प्रति ग्रॅम २९,३५० रुपयांवर बंद झाले. दुसरीकडे चांदीच्या दरातही घसरण झाली.
चांदीचे दर ८५० रुपयांनी घसर ते प्रतिकिलो ३९३०० रुपयांवर बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात ३.८० डॉलरच्या घसरणीसह १,२६१. ७५ डॉलर प्रति औंसवर पोहोचले.