Gold Rate Today: मागील आठवड्यात सोन्याच्या दराने उसळी घेतली होती. मात्र आता सोन्याचे दर घसरले आहेत. जगभरात इक्विटी मार्केटमध्ये होणाऱ्या चढ-उतारामुळं कमोडिटी बाजारात काल मोठ्या प्रमाणात दर घसरले होते. मागील आठवड्यात सोनं-चांदीचे दर वाढले होते. मात्र या आठवड्यात सोनं-चांदीचे दर पुन्हा घसरले आहेत. काल आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं $34 ने घरसले होते. तर, चांदीच्या दरात 5.5% ने घट झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी भारतीय वायदे बाजारात सोन्याच्या दरात नरमाई पाहायला मिळत आहे. मात्र चांदीच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली आहे. MCXवर आज सोनं तब्बल 870 रुपयांनी घसरले आहेत. 24 कॅरेट प्रतितोळा सोन्याचा भाव 69,710 रुपये आहेत. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावरही आनंद पसरला आहे. 


अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटीत कपात करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सोन्याच्या दरात तब्बल 5 हजारांची घसरण झाली होती. मात्र त्याच्या पुढच्याच आठवड्यात सोन्याचे दर पुन्हा वाढले होते. आज मात्र सोन्याचे दर पुन्हा कमी झाले आहेत. आज प्रतितोळा सोनं 69,710 रुपयांवर स्थिरावले आहे. 22 कॅरेट सोनं 63,900 रुपयांवर स्थिरावलं आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 800 रुपयांची घट झाली होती. 


असा आहे सोन्याचे दर


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  63, 900 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  69, 710 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   52, 280  रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6, 390 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   6, 971 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 228  रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   51, 120 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   55, 768  रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    41, 824  रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट-63, 900 रुपये 
24 कॅरेट-69, 710  रुपये
18 कॅरेट- 52, 280  रुपये