ईदच्या दिवशी सोनं आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण
सोन्य़ाचे भाव घसरले
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात आणि स्थानिय सराफाकडून मागणी कमी झाल्याने सोन्याच्या भाव कमी झाला आहे. आज सराफा बाजारात सोन्याचा भाव 390 रुपयांनी कमी झाला आहे. आज सोन्याचा भाव 31,800 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. दूसरीकडे चांदीचा भाव 42,000 रुपये झाला आहे. चांदी आज 1050 रुपयांनी कमी होत 41,350 रुपये प्रति किलो झाली आहे.
सराफा व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार अमेरिका आणि चीन यांच्यात वाढत्या तणावामुळे गुंतवणुकांनी सोन्यामध्ये गुंतवणुक कमी केली आहे. ज्यामुळे सोन्याचा भाव कमी झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात धातुंच्या किंमती घट झाली आहे. न्यूयॉर्कमध्ये काल सोनं 1.77 टक्क्यांनी कमी झालं. 1278.90 डॉलर प्रति औंस सोनं झालं. चांदी 3.44 टक्क्यांनी कमी होत 16.54 डॉलर प्रति औंस झाली.