मुंबई : सोनं खरेदी म्हणजे भारतीय स्त्रियांचा वीक पॉईंट. मात्र सध्याच्या लग्नसराईत सोन्याने घात केला आहे. सोन्याचा भाव चक्क ४३ हजारांपर्यंत जाऊन पोहचला आहे. येत्या दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव अक्षरशः ५० हजारपर्यंत जाण्याची शक्यता सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सोने दर वाढीचं मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी उलथापालथ होते आहे. नोटबंदी पासूनच सोन्याच्या भावात प्रचंड बदल झाले असल्याचं सोने व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुंतवणूकीसाठी सोन्याचा विचार करताना कोणी दिसंत नाही. मात्र सोन्याच्या भावाचा ९५ वर्षांचा इतिहास बघता सोन्यात गुंतवणूक करणं गरजेचं बनलं आहे.


अमेरिका-ईरान यांच्यातील वाढत चाललेला संघर्ष यामुळे सोन्याचे भाव वाढत आहेत. गुरुवारी सोन्याचा भाव 41 हजारांच्या घरात होता. मे-जून पर्यंत सोनं आणखी ५ ते ६ हजारांनी वाढण्याची शक्यता आहे.


२४ कॅरेट सोन्याचा भाव ४१ हजार ८०० रुपये आहे. लग्नसराईत मागणी वाढल्यास सोनं आणखी महागण्याची शक्यता वर्तवण्यत आली आहे. सोनं ५० हजारांपर्यंत देखील पोहोचण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. तर चांदीचा भाव देखील वाढत चालला आहे. आज चांदी ४५ ते ४६ हजार रुपये किलोवर पोहोचली आहे.


सोनं इतकं महागल्याने सर्वसामान्य आणि मध्यम वर्गाच्या लोकांनी १ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि नकली दागिने घेणं पसंद केलं आहे.