मुंबई  : भारतीय समाजात सोन्याच्या दागिन्यांना मोठे महत्व असते. अनेक लोकं देवस्थानांना दागिने दान करतात तर अनेकजण सणसमारंभ आणि लग्नकार्यासाठी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरात सध्या सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रशिया युक्रेन युद्धानंतर जगात सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. भारतातही सोन्याच्या किंमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.


आज मल्टीकमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ नोंदवली गेली. 51153 रुपये प्रति तोळेवर ट्रेड करीत होते. तर चांदीचे दर तब्बल 1 हजार रुपयांनी घसरून 61407 रुपये प्रति किलोवर ट्रेड करीत होते.


आज मुंबईतील 24 कॅरेट सोन्याचे दर 51710 रुपये प्रति तोळे इतके होते. तर चांदीचे दर 62,500 रुपये प्रति किलो इतके होते.


सोन्याच्या दरांनी सध्या 50 हजारी टप्पा पार केला असला तरी, गुंतवणूकदारांचा ओढा सोने खरेदीकडे वाढला असल्याचे दिसून येत आहे. 


सोन्याची शुद्धता कशी ओळखावी?


  • 22 कॅरेटचे दागिने असतील तर त्यामध्ये 916 लिहिलेले असेल.

  • 21 कॅरेटच्या दागिन्यांवर 875 लिहिलेले असते.

  • 18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 लिहिलेले असते.

  • 14 कॅरेटचे दागिने असतील तर त्यात 585 लिहिलेले असते.