मुंबई : सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दराने ३७ हजाराचा आकडा पार केला आहे. अमेरिका आणि चीनमधल्या वाढत्या व्यापार तणावामुळे सोनं महाग झाल्याचं बोललं जातं आहे. गुंतवणूकदारांचा सोन्यामधला रस वाढल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तसंच डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरला. त्याचाही परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी सोन्याच्या भावात 800 रुपयांची वाढ झाली होती. सोनं 36,970 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं आहे. सोनं 37 हजारापासून फक्त 30 रुपये कमी आहे.


ऑल इंडिया सर्राफा असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी म्हटलं की, सोन्याचा भाव आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर पोहोचला आहे. वाढत्या मागणीमुळे चांदीही हजार रुपयांनी वाढून 43,100 रुपये प्रति किलो झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यामुळे देखील सोनं महागलं आहे. 


दिल्लीमध्ये 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 800 रुपयांनी वाढून अनुक्रमे 36,970 आणि 36,800 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.