नवी दिल्ली : सोमवारी सोनं आणि चांदीच्या भावांमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याचे भाव १०० रुपयांनी कमी होऊन ३१,२५० रुपये प्रती १० ग्रॅम झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजार कमजोर झाल्यामुळे आणि व्यापाऱ्यांची मागणी घटल्यामुळे भाव कमी झाले आहेत. सोन्याबरोबरच चांदीचे भाव ६५० रुपयांनी कमी होऊन ३७,७०० रुपये प्रती किलो झाले आहेत. 


दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ३१,२५० तर ९९.५ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ३१,१०० रुपये कमी झाली आहे. मागच्या ३ दिवसांमध्ये सोन्याची किंमत २७० रुपये वाढली होती. ८ ग्रॅम सोनाच्या विटांची किंमत २४,५०० रुपयांवर कायम आहे.