Gold Rate Today | सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना सुवर्णसंधी; जाणून घ्या आजचे दर
Gold-Silver Price Today: गुरुवारी सोन्याच्या घसरणीला पाच दिवसानंतर ब्रेक लागला आणि त्यात किंचित वाढ झाली. एमसीएक्सवर सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली.
Gold-Silver Price Today: गुरुवारी सोन्याच्या घसरणीला पाच दिवसानंतर ब्रेक लागला आणि त्यात किंचित वाढ झाली. एमसीएक्सवर (MCX) सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली.
Gold Price Today 14th July 2022: सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर गुरुवारी सोन्याच्या दरात वाढ झाली. गुरुवारी दुपारी सोन्या-चांदीच्या जारी दरात किंचित वाढ झाली.
गुरुवारी दुपारी इंडिया बुलियन असोसिएशनने (https://ibjarates.com) जाहीर केलेल्या दरानुसार, 24 कॅरेट सोने 4 रुपयांनी किरकोळ वाढून 50804 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. गुरुवारी चांदीच्या दरातही वाढ झाली आणि चांदी प्रति किलो 56317 रुपये नोंदवली गेली.
मुंबईतील दर
सोने 24 कॅरेट 51160 रुपये प्रति तोळे
चांदी 57000 रुपये प्रति किलो
MCX वर सोने आणि चांदीचे दर
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, गुरुवारी सोने आणि चांदीमध्ये काहीशी घसरण नोंदवली गेली. दुपारी दोनच्या सुमारास सोने 0.72 टक्क्यांनी घसरून 50,437 रुपये प्रति तोळ्यावर होते तर चांदीचे दर जवळपास 1 टक्क्यांनी घसरून 56,574 रुपये प्रति किलो इतके होते.