Gold Rate Today | सोने 50 हजारी टप्प्यावर स्थिर; ग्राहकांची सराफा बाजारात गर्दी
सणासुदीच्या दिवसांनंतर सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठे बदल होत आहेत. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कमी झाले असताना आज पुन्हा सोन्याच्या दरांमध्ये तेजी दिसून आली.
मुंबई : सणासुदीच्या दिवसांनंतर सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठे बदल होत आहेत. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कमी झाले असताना आज पुन्हा सोन्याच्या दरांमध्ये तेजी दिसून आली. सराफ बाजारात सोन्याचे दरांमध्ये मोठे बदल होत असल्याने, सोन्यात गुंतवणूक करण्याचा उत्साह ग्राहकांमध्ये वाढला आहे.
MCX सोन्याचे वायदा बाजारात दर 49458 रुपये प्रति तोळे तर चांदीचे दर 66941 रुपये प्रति किलोवर ट्रेड होत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढत असल्याने भारतीय बाजारांवर त्याचा परिणाम जाणवत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर 55 हजार प्रति तोळेपर्यंत गेले होते.
सध्या सुरू असलेल्या तेजीच्या ट्रेंडमुळे सोने लवकरच पुन्हा या स्तरावर पोहचण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. काही दिवसात लग्नसराई सुरू होणार असल्यानेही सोन्याच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे.
16 नोव्हेंबररोजी देशातील प्रमुख शहरात सोन्याचे दर
मुंबईत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 49,360 रुपये
दिल्लीमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,670 रुपये
चेन्नईमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50,730 रुपये
बंगळुरूमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50,350 रुपये
पुणेमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50,850 रुपये
मिस्ड कॉल देऊन सोन्याचा दर जाणून घ्या
तुम्ही घरबसल्या सहज सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीनतम दर पाहू शकता.
भारतात हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो?
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.