Gold-Silver Rate : गुरुवारी सोने आणि चांदी दोघांच्या भावात मोठी घसरण नोंदवण्यात आली. मागणी कमी झाल्यामुळे गुरुवारी फ्युचर्स ट्रेडमध्ये सोन्याचा भाव 102 रुपयांनी घसरून 52,960 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. जागतिक स्तरावर देखील सोन्याचे दर घसरले आहे. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा भाव 0.19 टक्क्यांनी घसरून $1,772.40 प्रति औंस झाला आहे.


चांदीचे भावही घसरले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांदीचा भाव 283 रुपयांनी घसरून 61,714 रुपये प्रति किलो झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये चांदीचा भाव 1.13 टक्क्यांनी घसरून 21.28 डॉलर प्रति औंस झाला.


कमकुवत जागतिक ट्रेंडमुळे राष्ट्रीय राजधानीत गुरुवारी सोन्याचा भाव 161 रुपयांनी घसरून 53,235 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदीचा भावही 1,111 रुपयांनी घसरून 61,958 रुपये प्रतिकिलो झाला.


आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,770.5 डॉलर प्रति औंस, तर चांदी 21.32 डॉलर प्रति औंसवर बंद झाली.


 


  •     दिल्लीत 24K सोन्याचा भाव  52,510 रुपये / 10 ग्रॅम

  •     मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 52,360 रुपये  / 10 ग्रॅम

  •     लखनौमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 52,510 रुपये  / 10 ग्रॅम

  •     जयपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 52,510 रुपये  / 10 ग्रॅम

  •     पाटण्यात सोन्याचा भाव 24 कॅरेट 52,390 रुपये  / 10 ग्रॅम

  •     बंगळुरूमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,410 / 10 ग्रॅम

  •     कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,360 रुपये  / 10 ग्रॅम