मुंबई : जागतिक शेअर बाजारांमध्ये सध्या मोठा चढ उतार दिसत आहे. भारतीय बाजारांमध्येही एखाद्या दिवशी मोठी उसळी तर एखाद्या दिवशी मोठी घसरण नोंदवली जात आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करीत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात सध्या लग्नसमारंभाचे सिजन सुरू असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे सराफा बाजारांमध्ये लगबग दिसून येत आहे. आज मल्टीकमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे दरांमध्ये वाढ नोंदवण्यात आली. सोन्यामध्ये 282 रुपयांची वाढ होत 51111 रुपये प्रति तोळे इतके ट्रेड करीत होते तर चांदी 729 रुपये प्रति किलोने वाढून 62136 रुपयांवर ट्रेड करीत होते. 


मुंबईच्या सराफा बाजारातही सोन्याच्या दरांमध्ये वाढ नोंदवण्यात आली.. आज मुंबईत सोन्याचे दर  51,330 रुपये प्रतितोळे इतके होते. तर चांदीचे दर 61,400 रुपये प्रति किलो इतके होते.