Gold Price Today: सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज 26 एप्रिल रोजी पुन्हा एकदा सोन्याच्या दराने उसळी मारल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर, चांदीच्या दरातही वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय बाजारपेठेत सोन्याला झळाळी मिळाली आहे. 


सोन्या-चांदीचा आजचा भाव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्च ते मे महिना हा लग्नसराईचा काळ असतो. त्यामुळं या काळात मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केली जाते. ऐन लग्नासराईच्या हंगामात सोन्याचे भाव कडाडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अनेकजण दागिने खरेदीसाठी सोनं कमी होण्याची वाट पाहत आहेत. भारतीय बाजारात सोनं आणि चांदीच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. भारतीय बाजारपेठेत MCXवर सोन्याच्या वायद्याने 166 रुपयांची उसळी घेत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 71,380 रुपयांवर पोहोचले आहे. तर, चांदी 376 रुपयांनी वाढून 81,060 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेंड होत आहे. 


आंतरराष्ट्रीय बाजारात सोने घसरले


आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 0.6 टक्के तेजीसोबत 2329 डॉलरवर पोहोचले आहे. मात्र, येथे सोनं 2413ने खाली घसरले आहे. जवळपास 100 डॉलरने किंमती खाली घसरल्या आहेत. युएस गोल्ज फ्युचर 0.1 टक्क्यांनी वाढून 2,342 डॉलरवर आले होते. खरं तर जीडीपीचे आकडे पाहून युएस फेडरल रिझर्व्ह बँक इतक्या लवकर व्याजदरात वाढ करेल, याची शक्यता कमी आहे. हे कमकुवत आकडे पाहून महागाईची चिंता वाढली आहे. जीडीपीच्या आकड्यांनंतर बॉन्ड यील्डमध्येही वृद्धी झाली आहे. पाच महिन्यात सर्वाधिक 4.7 टक्कांवर हा आकडा पोहोचला होता. 


सराफा बाजारात काय सुरू आहे भाव?


 गुरुवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात किंचित घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. आंतरारष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्याने सराफा बाजारातही त्याचा परिणाम पाहायला मिळाला. गुरुवारी, सोन्याचे फ्युचर्स ७०,६५० रुपये तर चांदीचा वायदा ८१,७०० रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता.