Gold Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं-चांदीच्या दरांमुळं सोमवारी वायदे बाजारात तेजी दिसून आली आहे.  सोनं आणि चांदीच्या दरात तेजी आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोनं 160 रुपयांची वाढ झाली असून 76680 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. शुक्रवारी सोनं 76,544 रुपयांवर व्यवहार बंद झाला होता. चांदी या दरम्यान 186 रुपयांच्या तेजीसह 89.073 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार करत आहे. मागील सत्रात चांदी 88,887 रुपयांवर बंद झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशिया-युक्रेन युद्ध आणि पश्चिम आशियातील संघर्षाच्या स्थितीमुळं वैश्विक तणाव वाढला आहे. यामुळंही मौल्यवान धातुच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळं आज चांदीच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. आज चांदीच्या किंमतीत 900 रुपयांनी वाढून 91,700 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी ढाली आहे. मागील आठवड्यात चांदी 3,550 रुपये किलोग्रॅमची तेजी आली आहे. 


आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची वाढ झाली असून सोनं 78,000 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 150 रुपयांची वाढ झाली असून 71,500 रुपयांवर स्थिरावलं असून 18 कॅरेट सोन्याच्या दरात 120 रुपयांची वाढ होऊन 58,500 रुपयांवर स्थिरावले आहे.


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  71, 500 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  78, 000 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  58,500 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,150 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,800 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 850 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   57,200रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   62,400 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    46,800 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट- 71, 500 रुपये
24 कॅरेट- 78, 000 रुपये
18 कॅरेट- 58,500 रुपये