नववर्षाच्या आधीच ग्राहकांना दिलासा, सोनं-चांदी स्वस्त; वाचा 24 कॅरेटचे दर
Gold Price Today: आज सोन्याच्या दरात घट झाली की वाढ झाली जाणून घ्या
Gold Price Today: आज वर्षातील शेवटचा दिवस. नवीन वर्ष सुरू होण्याआधीच ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज सोनं आणि चांदीच्या दरात घट झाली आहे. वायदे बाजारात आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही मौल्यवान धातुत नरमाई आल्याचे दिसत आहे. आज सकाळी सोन्याचे दर 400 रुपयांनी कोसळले आहेत. काय आहेज सोन्याचे दर जाणून घेऊया.
आंतरराष्ट्रीय बाजारात जागतिक पाळतीवरील घडामोडींमुळं सोन्याच्या दरात चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत होती. मात्र आज दर घसरले आहेत. चांदीमध्यही आज 233 रुपयांची घट झाली आहे. त्याचबरोबर आज चांदी 87,298 रुपये प्रतिकिलोवर चांदी स्थिरावली आहे. काल चांदी 87,531 रुपयांवर स्थिरावली होती. तर 24 कॅरेट सोन्याचे 440 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 77,560 रुपयांवर स्थिरावलं आहे.
24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 77,560 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांची घट झाली असून 10 ग्रॅम सोनं 71,100 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 18 कॅरेट सोनं 320 रुपयांनी कमी होऊन 58,180 रुपयांवर स्थिरावलं आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 71, 100 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 77, 560 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 58,180 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,110 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,756 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 818 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 56,880रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 62,048 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 46,544 रुपये
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 71, 100 रुपये
24 कॅरेट- 77, 560 रुपये
18 कॅरेट- 58,180 रुपये