Gold Rate today | सोन्याच्या दरात गुंतवणूकीची सुवर्ण संधी; येत्या काळात तुफान तेजीची शक्यता
Gold rate today 7th july 2022 in mumbai | सोने खरेदीसाठी भारतीय नेहमीच उत्साही असतात. सण समारंभ किंवा लग्नसराईमध्ये सोन्याच्या दागिन्यांना मागणी असते.
मुंबई : सोने खरेदीसाठी भारतीय नेहमीच उत्साही असतात. सण समारंभ किंवा लग्नसराईमध्ये सोन्याच्या दागिन्यांना मागणी असते. तसेच सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे भारतात नेहमीच सोन्याची मागणी असते.
जागतिक पातळीवर मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांचे शेअर बाजार वर खाली हेलकावे घेत असताना सोन्यात गुंतवणूकीकडे ओघ वाढत आहे.
आज देशातील मल्टीकमोडीटी एक्स्चेंजमध्ये सोन्याचे दर 50674 रुपये प्रति तोळेवर ट्रेड करीत होते. तर, 57177 रुपये प्रति किलोवर ट्रेड करीत होते.
IBJA संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईतील 24 कॅरेट सोन्याचे दर 50924 रुपये प्रति तोळे तर, चांदीचे दर 56466 रुपये प्रति किलो इतके होते.
1 जुलैपासून सोन्याच्या दरात वाढ
सोनं 1 जुलैपासून सोनं महागलंय. केंद्र सरकारनं सोन्यावरील आयात शुल्कात 5 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे आता आयातशुल्क 15 पूर्णांक 75 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर उपकर, जीएसटी मिळून कर 18 पूर्णांक 75 टक्क्यांवर जातोय. (gold import duty increased by 5 percent government issued notification)
आयात शुल्कात 5 टक्क्यांची वाढ
सोन्यावरील आयात शुल्क 10.75% वरून 15.75% पर्यंत वाढले आहे. सोन्यावर आयात शुल्क आणि जीएसटीसह एकूण 18.75% कर भरावा लागेल. आयात शुल्क वाढवल्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसण्याची शक्यता आहे. वाढलेला कर आणि वाढत्या मागणीमुळे वायदा आणि रिटेल बाजारात सोनं तब्बल अडीच हजारांनी महागण्याची शक्यता आहे. मात्र यामुळे सोनं तस्करी बोकाळेल अशी भीती व्यापारी व्यक्त करतायत.