मुंबई : दिवाळीनंतर सोन्याच्या दरांमध्ये स्थिरता दिसून येत असली तरी आज मुंबईत सोन्याच्या दरांमध्ये काहीशी घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमती स्थिर आहेत. त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)मध्ये सोन्याचे दर काल 48 हजार प्रति तोळेच्या जवळपास ट्रेड करीत होते. तर चांदीच दर हे 64 हजार 875 रुपये प्रति किलोच्या आसपास ट्रेड करीत होते.


दिवाळीच्या दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये घट झाली होती. त्यानंतर सोन्याचे दर 48 हजारांच्या आसपास ट्रेड करीत आहेत. चांदीच्या दरांमध्ये मात्र उसळी पाहायला मिळाली आहे. 


मुंबईतील सराफा बाजारातही सोन्याच्या दरांमध्ये सध्या स्थिरता दिसून येत असली तरी येत्या काळात सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. 


मुंबईतील सोने चांदीचे दर
22 कॅरेट 46,990 रुपये प्रति तोळे
24 कॅरेट 47,990 रुपये प्रति तोळे
चांदीचे दर 64 हजार 800 रुपये प्रति किलो


सोन्याच्या दरांमध्ये कोरोना संसर्गादरम्यान मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवली गेली होती. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर 56 हजार रुपये प्रति तोळेच्या पार गेले होते. सध्या सोन्याच दर स्थिर आहेत. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करीत आहेत.