Gold-Silver Price Today 14 November 2023: आज दिवाळी पाडवा आहे. पाडवा हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळं या दिवशी सोनं खरेदी केले जाते. या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानलं जातं. आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दागिने करणार आहात तर आजच जाणून घ्या सोन्याचे दर. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुड रिटन्सनुसार, आज 14 नोव्हेंबर रोजी प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किमत 55,450 रुपये आहे. तर, 24 कॅरेट सोन्याची 60,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोने खरेदीची किंमत 45,370 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 


गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. इस्राइल-हमास युद्धामुळं मध्यंतरी सोनं चांदीच्या दरात वाढ झाली होती. मात्र, आतंराराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून सतत सोन्याच्या किमतीत घसरण होत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर घसरण होत असल्याने सोनं खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. धनतेरस व लक्ष्मी पुजनाच्या दिवशी सराफा बाजारात कोट्यवधीची उलाढाल झाली आहे. 


मुंबईत सोन्याचा दर आज 100 रुपयांनी कमी झाला आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,490 रुपये प्रति तोळा आहे. तर दिल्लीतही सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 60,490 रुपये इतका आहे. चेन्नईत 10 ग्रॅम सोन्याचा भाव60,980 रुपये इतका आहे. 


सराफा बाजारात आज चांदीची किंमत 72,400 रुपये प्रति किलो इतकी आहे. तर, कालच्या तुलनेत चांदीच्या दरात 600 रुपयांची घट झाली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीची किंमत 74,000 रुपये प्रति किलो होती तर, आता चांदी 72,400 रुपयांवर पोहोचली आहे. 


पाडव्याचा शुभ मुहूर्त


आज दिवाळी पाडवा असून या दिवशी पत्नी-पतीला ओवाळते व पती पत्नीला भेटवस्तु देतो. यंदा दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6 वाजून 14 मिनिटांपासून संध्याकाळी 8 वाजून 35 मिनिटांपर्यंत आहे.