नवी दिल्ली : सोन्याच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये तेजी दिसून आली आहे. आज दसऱ्याच्या दिवशी भारतीय लोक सोने खरेदीला महत्व देतात. त्यामुळे आज विविध शहरांमध्ये सोन्याचे दर किती आहेत हे जाणून घेण्याची ग्राहकांची इच्छा असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर सोन्याच्या दर दुपारी 12 वाजता 47 हजार 895 रुपये प्रति तोळे इतक्या किंमतीवर ट्रेड करीत होते. तर चांदी 63 हजार 570 रुपयांवर ट्रेड करीत होती. 


गुरूवारी सोने - चांदीच्या दरामध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली होती. दिल्लीतील सराफा बाजारात सोने प्रति तोळे 455 रुपयांनी महागले होते. तर मुंबईत सोने प्रतितोळे  680 रुपयांनी महागले होते. आजही बाजारात काहीशी वाढ नोंदवण्यात आली आहे.


भारतातील 4 प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर
मुंबई  47,980 रुपये प्रति तोळे
नवी दिल्ली 51,120 रुपये प्रति तोळे
चैन्नई 49,260 रुपये प्रति तोळे
कोलकाता 50,010 रुपये प्रति तोळे


सोन्याच्या सध्याच्या किंमती सोन्याच्या ऐतिहासिक उच्चांकीपेक्षा 8 हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे. 2020 च्या ऑगस्टमध्ये सोन्याच्या दरांनी 56200 रुपये प्रति तोळे इतका उच्चांक गाठला होता.