Gold Rate Today | सोने ऐतिहासिक उच्चांकी गाठण्याच्या तयारीत; जाणून घ्या आजचे भाव
सोने चांदींमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे.
मुंबई : सोने चांदींमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. अमेरिककेचा डॉलर मजबूत आणि बॉंन्ड यिल्डमध्ये तेजी आल्याने सोन्याच्या दरांवर दबाव आहे. गुरूवारी मल्टीकमोडिटी एक्सचेंजमध्ये MCX सोन्याचे दर 180 रुपये प्रतितोळे घसरले होते. तरी मुंबईतील सराफा बाजारात सोन्याचे दर वधारले होते.
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडींचाही सोन्याच्या दरांवर परिणाम होत असतो. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट काही अंशी कमी होत असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे बाजारातही सकारात्मकता परतेय. या पार्श्वभूमीवर MCXवर सोन्याचा दर 48 हजार 674 रुपयांवर ट्रेंड करीत होता.
गेल्या आठवड्यात सोन्याचे दर हळुहळु वाढत असताना आज MCXमध्ये सोन्याच्या दरात काहीशी घसरण दिसून आली आहे. परंतु मुंबईतील सोने बाजारात 350 रुपये प्रतितोळे इतकी वाढ झाली आहे. एकंदरीच सोने बाजाराचा ट्रेंड लक्षात घेता. येत्या काही महिन्यात सोने 55 हजार प्रतितोळेच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
मुंबईतील सोन्याचे दर
22 कॅरेट 46 हजार (+350)
24 कॅरेट 47 हजार (+350)
चांदीच्या किंमतीत घसरण
चांदीच्या दरांमध्येही MCX मध्ये 540 रुपये प्रति किलोची घसरण नोंदवली गेली. आज चांदीचा दर 72 हजार 374 रुपये इतका होता. तर मुंबईतील चांदीच्या किंमतीत 700 रुपये प्रति किलो घसरण नोंदवण्यात आली. मुंबईतील चांदीचा दर आज 72 हजार 300 इतका होता.
(वरील सोने - चांदीचे भाव जीएसटी आणि अन्य टॅक्स वगळून दिले आहेत, स्थानिक ज्वेलर्सप्रमाणे यात बदल होऊ शकतो.)