मुंबई : सोन्यात मंगळवारी म्हणजे तिसऱ्या दिवशी देखील वाढ पाहायला मिळाली. दिल्लीत सराफ बाजारात सोन्यात वाढ झाली आहे. 10 ग्रॅम सोन्यात 50 रुपयांची वाढ झाली असून 32 हजार 230 रुपये आता सोन्याचा दर आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरात देखील वाढ झाल्यामुळे 40,650 प्रति किलोग्रॅम असा दर आहे. 


या कारणामुळे सोन्याच्या बाजारात झाली वाढ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्न समारंभात सोन्याचा अधिक वापर केला जातो. याचा परिणाम सोन्याच्या दरात झाला आहे. विदेशी बाजारात सोन्याचा दर वाढला आहे. वैश्विक बाजारात सिंगापुरमध्ये सोन्याचे दर 0.08 टक्के पडला असून 1,312.60डॉलर प्रति असा आहे. तर राष्ट्रीय राजधानीमध्ये 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्धता सोन्याचा दर हा 50 रुपयांनी वाढला आहे क्रमशः ही वाढ 32,230 रुपये आणि 32,080 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचली आहे. 


या अगोदर दोन वेळा सोन्याचा दर 200 रुपयांनी वाढली आहे. 8 ग्रॅमची किंमत ही 24,800 रुपयांवर आहे. तर चांदीच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली असून 40,650 रुपये प्रति किलोग्रॅमवर हा दर पोहोचला आहे.