मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर अस्थिर आहेत. तरी देखील सोन्याची मागणी कमी झालेली नाही. लग्न सराई आणि सण जवळ आल्यामुळे सोने धातूच्या मागणीत वाढ झाली आहे. आज 100 ग्रॉम सोन्याचे दर 100 रूपयांनी कमी झाले आहेत. तर 10 ग्रॉम सोन्याचे दर 10 रूपयांनी कमी झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्यासाठी जवळपास 47 हजार 200 रूपये मोजावे लागत आहेत. ही माहिती गोल्ड रिटर्न वेबसाईटने दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या शहरातील सोन्याचे दर 
शहर             22 कॅरेट              24 कॅरेट
मुंबई           47 हजार 190       48 हजार 190
दिल्ली         47 हजार 400      51 हजार 400
चेन्नई           45 हजार 410       49 हजार 540
कोलकाता    47 हजार 20       48 हजार 460


तज्ज्ञांच्या मतानुसार 2021 वर्षाअखेर  सोन्याचे दर 60 हजार रूपयांचा आकडा पार करू शकतात. म्हणजे जर तुम्ही सहा महिन्यांमध्ये सोने  या मैल्यवान धातूत पैसे गुंतवल्यास फायदा नक्कीचं होईल. येत्या काळात सोन्याचे तर गेल्या वर्षीचा रेकॉर्ड मोडू शकतात. सोन्याच्या गुंतवणुकीबद्दल सांगायचं झालं तर गेल्या वर्षी सोन्याने 28 टक्के रिटर्न्स दिलं.