Gold Rate Today | सोन्याच्या दरांत पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर
जागतिक बाजारात अनिश्चितेतेच्या वातावरणामुळे आठवड्याच्या व्यवसायाच्या दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या किंमती घसरण नोंदवली गेली.
जागतिक बाजारात अनिश्चितेतेच्या वातावरणामुळे आठवड्याच्या व्यवसायाच्या दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या किंमती घसरण नोंदवली गेली.
मुंबई : जागतिक बाजारातून संमिश्र व्यवहार दिसून येत आहेत. आठवड्याच्या व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी सोन्यात काहीशी घसरण नोंदवली गेली. सध्या सोने 51 हजार प्रति तोळेच्या खाली ट्रेड करीत आहे.
मल्टीकमोडीटी एक्स्चेंजमध्ये आज सोन्याचा भाव 50601 रुपये तोळे इतका ट्रेंड करीत होता. तर चांदीचे भाव 54631 रुपये प्रति किलो इतके होते.
मुंबईत आज सराफा बाजारात सोन्याचे भाव 350 रुपयांनी घसरून 50,780 रुपये प्रति तोळे इतके होते. तर चांदीचे दर 54,500 रुपये प्रति किलो इतके होते.
तज्ज्ञांचे मत
युरोप आणि भारतासह जगभरात व्याजदर वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. डॉलरच्या वाढत्या दबावामुळे सोन्यात आणखी घसरण होऊ शकते. येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी घसरण होऊन ती 49 हजार रुपयांपर्यंत येऊ शकते.