Gold Price Today on 13 November 2022: सोने आणि चांदी खरेदीला अनेकजण प्राधान्य देताना दिसतात. सोने दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज सोने-चांदीच्या किमतीत तेजी झालेली दिसून आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX वर सोन्याची किंमत) आज सोन्याचा भाव 52000 रुपयांच्या पुढे गेला आहे. सोने दरात 480 रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चांदीचा भावही 62000 च्या वर आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल सांगायचे झाले तर, येथे सोने किमतीत वाढ झालेली दिसून येत आहे. 


सोने आणि चांदी यांच्या किमतीत वाढ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोने आणि चांदी यांच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 0.19 टक्क्यांच्या वाढीसह 52210 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला आहे. तसेच चांदीचा दर 0.41 टक्क्यांच्या वाढीसह 62166 रुपये प्रति किलो झाला आहे. 


आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल...


जागतिक बाजारपेठेत सोने-चांदी यांच्या दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत सांगायचे झाले तर, येथील सोनेचा दर 2.71 टक्क्यांनी वाढून $1,751.91 प्रति औंस झाला. त्याचवेळी, चांदीची स्पॉट किंमत 3 टक्क्यांनी वाढून $ 21.65 प्रति औंसवर पोहोचली आहे.


खरेदी करताना याकडे विशेष लक्ष द्या


सोने खरेदी कताना तुम्ही नेहमी काळजी घेतली पाहिजे. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. हॉलमार्क पाहून खरेदी करा. हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी केली नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते. हॉलमार्क नसेल तर तुम्हाला एकाद्यावेळी विक्री करण्याची वेळ येईल, तेव्हा तो भाव मिळणार नाही. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरु शकता. 'बीआयएस केअर अॅप'द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करु शकता.


असे पाहू शकता तुमच्या शहरातील सोने दर


तुमच्या शहरातील सोन्याची किंमत तपासा आणि खरेदीला प्राधान्य द्या. तुम्ही तुमच्या घरी बसूनही सोने दराची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुमचा मेसेज येईल.


मुंबईतील सोने दर (24 Carat Gold Rate in Mumbai Today)


ग्रॅम 24 के सोने किंमत दररोजचा किंमत बदल
1 ग्रॅम
₹ 5,215 + ₹ 48
8 ग्रॅम
₹ 41,720 + ₹ 384
10 ग्रॅम
₹ 52,150 + ₹ 480
100 ग्रॅम
₹ 5,21,500 + ₹ 4,800