Gold rate today | आता सोने खरेदी कराल तर फायद्यात रहाल; वाढते दरांमुळे उच्चांकीचे संकेत
सोने चांदीच्या किंमतींमध्ये गेल्या आठवड्यांपासून वाढ होत आहे.
मुंबई : सोने चांदीच्या किंमतींमध्ये गेल्या आठवड्यांपासून वाढ होत आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या किंमतीत फारशी वाढ झालेली नाही. मल्टीकमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सोन्याचे ट्रेडिंग आज 48 हजार 307 वर बंद झाले. तर दिवसभरात 48 हजार 428 रुपयांचा उच्चांकी सोन्याने गाठली होती.
गेल्यावर्षी कोरोनाच्या संकट काळात लोकांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली होती. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर 56 हजार 191 रुपयांवर पोहचले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत सध्या सोने 43 टक्क्यांनी घसरले आहे.
सोन्याचे दर 60 हजारावर जाण्याची शक्यता
मोतीलाल ओसवाल फाइनाशिअल सर्विसेसच्या अहवालानुसार, 2021 मध्ये सोन्याच्या दरांमध्ये अनेकदा उतार चढ पहायला मिळाली. अनेक देशांमध्ये लसींना मिळालेली परवानगी, अमेरिकी निवडणूका, फार्मा कंपन्यांचे शेअर्स, डॉलरच्या किंमती कमी जास्त होणे आदीं कारणं सोन्याच्या दरात चढ उतार होण्यास कारणीभूत आहेत.
मुंबईतील आजच्या सोन्याचे दर
22 कॅरेट 45,650 प्रतितोळे
24 कॅरेट 46,650 प्रतितोळे
केडिया कमोडिटीच्या डायरेक्टर अजय केडिया यांच्या मतानुसार, सोन्यात येत्या काळात तेजी येण्याचे संकेत आहेत. जगभरातील कमी व्याजदरे, कोरोनाच्या बाबतीतील अनिश्चितता, अधिक लिक्विडिटीमुळे महागाईत वाढ, ईटीएफमध्ये खरेदी, केंद्रीय बँकांची सोन्यात खरेदी, डॉलरच्या किंमतीत घसरण, देशांमध्ये जिओ - पॉलिटिकल तणाव इत्यादी कारणांमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
(वरील सोने - चांदीचे भाव जीएसटी आणि अन्य टॅक्स वगळून दिले आहेत, स्थानिक ज्वेलर्सप्रमाणे यात बदल होऊ शकतो.)