नवी दिल्ली : सोन्याची मागणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय बॅंकांची व्याज स्वस्त ठेवण्याची पॉलिसी आणि भारतातील सोन्याची मागणी (Gold price today) पाहता या वर्षात चौथ्यांदा सोन्याची मागणी वाढलीय असं मोतीलाल ओस्वाल (Motilal Oswal) फायनान्स सर्व्हिसेसने म्हटलंय  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्यात गुंतवणीकीसाठी चांगला पर्याय असल्याचे फर्मने म्हटलंय. गेल्या एक दशकात भारतात सोन्याने १५९ टक्के रिटर्न दिला. घरेलू शेअर निफ्टीने या दरम्यान ९३ टक्के रिटर्न दिले असे रिपोर्टमध्ये म्हटलंय. 


सोन्याचा भाव मोठ्या अवधीत ६५-६७ हजार रुपये १० ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. सोन्याची मागणी तिसऱ्या तिमाहीत ३० टक्के पडल्यानंतर चौथ्या तिमाहीत पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण यादरम्यान सोन्याच्या खरेदीमध्ये वाढ झालीय. 


अमेरिकेतील निवडणुकीनंतर येणारे काही महिने सोन्याच्या किंमती ठरण्यासाठी महत्वपूर्ण असतील. यावेळी केंद्रीय बॅंकांची भूमिका, कमी व्याज दर, कोविड १९ (Covid 19) प्रादुर्भाव आणि इतर घटनांचा सोन्याच्या किंमतींवर परिणाम होऊ शकतो.



रिपोर्टनुसार, केंद्रीय बॅंकांनी आपल्या अर्थव्यवस्थेला सहाय्य देण्यासाठी व्याज दरांमध्ये कपात केली आणि बाजारामध्ये पैशांचा प्रवाह वाढलाय. व्याजदर नकारात्मक दिशेने जाणार नाही पण निम्न स्तर २०२३ पर्यंत राहील असे अमेरिती फेड रिझर्वचे प्रमुख जेरॉम पावेल यांनी म्हटलंय. 


पुन्हा वाढेल सोन्याचा दर 


सणांमुळे किरकोळ खरेदी मजबूत होईल अशी अपेक्षा आहे. भारतामध्ये सोन्याची मागणी तिसऱ्या तिमाहीत ३० टक्क्यांनी कमी झाल्यानंतर चौथ्या तिमाहीत पुन्हा वाढण्याची शक्यता आहे असे जागतिक सुवर्ण परिषद (डब्ल्यूजीसी) च्या अहवालात म्हटलंय.